पेट्रोल (Petrol ), डिझेल (diesel) दरवाढीपाठोपाठ सीएनजी गॅसच्या (CNG gas) किमतीत वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas Limited) कंपनीने उद्यापासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे...
वाहतूक आणि इतर खर्चात वाढल्याने सीएनजीच्या किमती वाढवण्यात आल्याचे महानगर गॅस लिमिटेडने म्हंटले आहे. सीएनजीच्या किमतीत प्रती किलो २.५८ रुपये आणि पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात येणार आहे.
यामुळे मुंबईत एक किलोसाठी सीएनजीचा भाव ५१.९८ रुपये इतका होईल. तर पाईप गॅससाठी ग्राहकांना स्लॅब-१ साठी ३०.४० रुपये प्रती युनिट आणि स्लॅब-२ साठी ३६ रुपये प्रती युनिट दर आकारण्यात येईल, असे कंपनीने म्हंटले आहे.