Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

“बहिरं सरकार ऐकेल का? मनसेचा सवाल

“बहिरं सरकार ऐकेल का? मनसेचा सवाल
, सोमवार, 28 जून 2021 (08:04 IST)
करोनाचं संकट पूर्णपणे टळेपर्यंत मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा विचार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. असं असतानाच आता सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोकल प्रवासास बंदी असल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल या तरुणाने रेल्वेच्या कार्यालयातून खंत व्यक्त केली असून, हाच व्हिडीओ ट्वीट करत मनसेनं ठाकरे सरकारला सवाल केला आहे.
 
सोशल मीडियावर मुंबईत एका करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचाऱ्यांना वगळता इतरांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र, असं असतानाही या तरुणाने लोकलमधून प्रवास केला. परेल स्थानकावर टीसीने त्याला पकडलं. त्यानंतर त्याने व्हिडीओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली. तसंच सरकारचंही लक्ष वेधलं. या तरुणाचा व्हिडीओ मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि “बहिरं सरकार ऐकेल का???,” असा सवाल ठाकरे सरकारला केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमवारी लसीकरण सुरु; 66 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ तर एका केंद्रावर मिळणार ‘कोव्हॅक्सीन’ लस