अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थ संकल्प 2017-18 सादर करत मध्यमवर्गीयांना करात सवलत दिली आहे. 2.50 ते 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्यांवर आता 10 ऐवजी 5 टक्केच कर आकारण्यात येईल.
5 ते 10 लाख रुपये 10 लाख रुपयांवरील उत्पन्न असणार्यांसाठी कररचना तशीच ठेवण्यात आली असून ही आधीप्रमाणेच अनुक्रमे 20 व 30 टक्केच आकारण्यात येईल.
3 ते 3.5 लाख वार्षिक उत्पन्न आय असणार्यांकडून 2500 रूपये कर आकरण्यात येईल. 5 लाखाहून अधिक आयवर सर्वांना 12 हजार 500 रूपयांचा फायदा मिळणार. 50 लाख ते 1 कोटी वार्षिक आय असणार्यांना 10 टक्के सरचार्ज लागणार.
जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणार्यांची चौकशी केली जाणार नाही, असे जेटली यांनी सांगितले.