Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

डिझेल-पेट्रोलचे घरगुती वितरण सुरू

Indian oil corporation mobile dispenser
ऑनलाईन शॉपिंगबद्दल देशातील वाढत असलेलं कळ बघता Indian Oil Corporation ने मोबाइल डिस्पेंसरने इंधन वितरित करण्यास सुरवात केली आहे. दक्षिण भारतात अशा प्रकारची सेवा देणारी ही पहिली कंपनी आहे. तथापि, यापूर्वी बऱ्याच राज्यांमध्ये आयओसीप्रमाणेच, एचपीसीएलने ग्राहकांच्या घरापर्यंत डिझेलच्या घरगुती डिलिव्हरी सुरू केली होती.
 
सध्या, औद्योगिक आणि थोक ग्राहकांना जवळच्या रिटेल आउटलेटमध्ये जाऊन आणि कंटेनर भरणे आवश्यक आहे. या नवीन उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या दारावर इंधन वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ करणे आहे. याव्यतिरिक्त इंधन समस्या सोडविणे आणि अनावश्यक इंधनाचा लीकेज, कंटेनर / बॅरल्समध्ये इंधन असुरक्षित हाताळणी टाळणे देखील आहे. याची सुरुवात एक मोबाईल डिस्पेंस आणि 6,000 लीटर इंधन टाकीसह चेन्नई मधील कोल्लुथूर येथे इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर उद्घाटन समारंभ आयोजित करून सुरू केली गेली. तथापि, या सुविधेचा फायदा घेण्यासाठी किमान 200 लीटर ऑर्डर करणे आवश्यक आहे. 
 
मोबाईल अॅप (Repose app) द्वारे ग्राहक ते ऑर्डर करण्यास सक्षम असतील. त्याचवेळी 2,500 लीटरपेक्षा अधिकच्या ऑर्डरसाठी, ग्राहकाकडे स्टोरेजसाठी पीईएसओ (PESO) परवाना असणे आवश्यक आहे. या अॅपने एकदा ऑर्डर केल्यावर ग्राहकाचे संपूर्ण तपशिलासह (नाव, सेल फोन नंबर, आवश्यक प्रमाणात, पत्ता आणि वितरण वेळ) संबंधित इंडियन ऑइल डीलरपर्यंत पोहोचेल आणि ऑर्डर मिळाल्यानंतर मोबाईल डिस्पेंसर गंतव्य स्थानापर्यंत पोहोचेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खुशखबर : निवृत्त एस टी कर्मचारी वर्गाला मिळणार वेतनवाढीतील फरकाची रक्कम एक रकमी