वॉशिंग्टन- Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून वर्षाअखेरपर्यंत ते त्यांचे पद सोडतील.
अॅमेझॉनने घोषणा केली की, एडब्ल्यूएसचे सीईओ अँडी जेसी या वर्षातील तिसऱ्या तिमाहीमध्ये जेफ बेझोस यांचे स्थान घेतील. जेसी सध्या अॅमेझॉनच्या वेब सर्व्हिसचे प्रमुख आहेत. जेफ बेझोस बोर्डचे कार्यकारी अध्यक्ष असतील. बेझोस यांनी आपल्या कर्मचार्यांना या निर्णयाबद्दल माहिती पत्र पाठवले आहे.
बेझोस यांनी आपल्या पत्रात म्हटले की ते कंपनीच्या CEO पदाची भूमिका सोडत आहे.
जेफ बेझोस यांनी स्टार्टअपच्या स्वरुपात अॅमेझॉनची स्थापना केली होती. आज अॅमेझॉन कंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून कंपनीने 2020 च्या शेवटच्या तीन महिन्यात 100 बिलियन डॉलरची विक्री केली होती.