Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

स्वामी विवेकानंद प्रेरक प्रसंग : सत्य बोलण्याची हिम्मत

swami vivekananda
, बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (08:55 IST)
स्वामी विवेकानंद एकदा वर्गात मित्रांना कहाणी सांगत होते. ते सगळे इतके लीन होते की त्यांना माहितच पडले नाही की मास्तर वर्गात आले आणि त्यांना शिकवणे देखील सुरु केले आहेत. तेव्हा मास्तरांना कुजबूज ऐकू आली तर त्यांनी जोरात विचारले- कोण गप्पा करत आहे? तेव्हा वर्गात सर्वांनी स्वामीजी आणि त्यांच्या मित्रांकडे इशारा केला. मास्तरांनी लगेच विद्यार्थ्यांना बोलावून त्यांना पाठसंबंधी प्रश्न विचारला, तेव्हा कोणीही उत्तर देण्यात सक्षम नव्हतं पण जेव्हा कोणी उत्तर दिले नाही तेव्हा मास्तरांनी तोच प्रश्न स्वामीजींना विचारला.
 
स्वामीजींनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मास्तरांना विश्वास बसला की स्वामीजी शिकवणीकडे लक्ष देत होते पण इतर विद्यार्थी गप्पा मारत होते. तेव्हा त्यांनी स्वामीजींना वगळता सर्वांना बेंचवर उभे राहण्याची शिक्षा ‍केली. सर्व विद्यार्थी बेंचवर उभे राहू लागले तेव्हा स्वामीजींनी देखील तेच केले. मास्तरांनी त्यांना बसायला सांगितले कारण त्यांनी प्रश्नाचं उत्तर दिले होते. पण स्वामी म्हणाले की ”मलाही शिक्षा व्हायला पाहिजे कारण मीच यांच्याशी गप्पा मारत होतो” तेव्हा त्यांच्या सत्य बोलण्याची हिम्मत बघून सर्वजण प्रभावित झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिओ वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी, आता JioPagesवर 11 भारतीय भाषांमध्ये माहिती शोधू आणि वाचू शकता