Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेट एअरवेजला ग्राहक मंचाचा दणका

जेट एअरवेजला ग्राहक मंचाचा दणका
जेट एअरवेजला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. येत्या ४५ दिवसांत ग्राहकाला तिकीटाचे व नुकसान भरपाई म्हणून ३५ हजार १९० रुपये परत करावे, असे आदेश मंचाने दिले आहे. 
 
या प्रकरणात नऊतेज सिंह (चेतना अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट) यांनी जेट एअरवेज विरोधात ग्राहक मंचात तक्रार दिली होती. तक्रारदार हे कायम पुणे ते श्रीनगर असा प्रवास करीत. त्यासाठी ते पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते श्रीनगर अशा दोन टप्प्यात विमानाने जात. त्यांनी २७ फेब्रुवारी २०१६ रोजी १५ जुन २०१६ ला सकाळी  ७ वाजून ३५ मिनिटांनी दिल्लीला निघणारे जेट एअरवेजच्या विमानाचे तिकीट बुक केले होते. तक्रारदार नेहमीचे ग्राहक असल्याने कंपनीने त्यांना १८ हजार २२५ रुपयांचे तिकीट सवलत देवून १४ हजार २४९ रुपयांत बूक केले. दोन वेळा तिकीट कन्फॉर्म झाल्यानंतरही अचानक त्यांना विमानाची वेळी बदलण्यात आल्याचे सांगितले. ७ वाजून ३५ मिनिटांनी निघणारे विमान आता ५ वाजून ३० मिनिटांनी निघेले असे जेट एअरवेजकडून सांगण्यात आले.

मात्र वयोव-द्ध असल्याने बदललेल्या वेळेत जाणे शक्य होणार नाही, असे त्यांनी जेट एअरवेज कळले. मात्र त्यांचा सकारात्मक प्रतिसाद न आल्याने त्यांनी दुस-या कंपनीचे तिकीट बुक के ले व बुक केलेल्या तिकीटीचे पैसे परत करण्याची जेट एअरवेजकडे मागणी केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादीने पुणे लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडला