कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पाद्कांना तातडीने प्रति क्विंटल पाचशे रुपये अनुदान देण्यासाठी नाशिकचे खासदार, आमदार व बाजार समितीच्या सभापतींनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
महाराष्ट्रातील दुष्काळ स्थिती व सततच्या कमी बाजारभावामुळे शेतकर्यांनी शेतीतून उत्पादन घेण्यासाठी बँकांकडुन किंवा सावकारांकडून घेतलेले कर्ज देखील परतफेड करणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याने देशातील शेतकर्यांना संपूर्ण कजमाफी देण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.