Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

Reliance Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 1 GB डेटा फक्त 3.5 रुपयांमध्ये

jio new
, सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (14:12 IST)
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे आपल्या ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन (JIO Recharge Plan)आहेत. आज तुम्हाला जिओच्या अशाच एका स्वस्त प्रीपेड प्लॅनबाबत सांगणार आहोत, ज्यामध्ये  1 जीबी डेटासाठी केवळ 3.5 रुपये खर्च करावे लागतात. सविस्तर जाणून घेऊया या प्लॅनबाबत :
फक्त  3.5 रुपयांमध्ये 1 GB डेटा :-
रिलायन्स जिओकडे 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे. 84 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी इंटरनेट म्हणजेच एकूण 168 जीबी डेटा मिळतो. दिवसाची 2 जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर 64Kbps च्या कमी इंटरनेट स्पीडने डेटा वापरण्यास मिळतो. म्हणजेच 599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 3.57 रुपयांमध्ये एक जीबी डेटा वापरण्यास मिळतो. 
 
इंटरनेट डेटाशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये (JIO Recharge Plan) अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग, नॉन-जिओ नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटे, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. एकप्रकारे जिओचा हा प्लॅन 249 रुपये आणि 444 रुपयांच्या प्लॅनपेक्षाही स्वस्त आहे. कारण 444 रुपयांच्या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. यात एकूण 112 जीबी डेटा मिळतो, पण त्यासाठी साधारण 1 जीबी डेटासाठी 4 रुपये मोजावे लागतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली दंगल प्रकरण : उमर खालिदला 'सूत्रधार' म्हणून अटक