दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने (Samsung)आपल्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीचा Galaxy M01 आता स्वस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी ई-कॉमर्स वेबसाइट अॅगमेझॉनने (Amazon) या फोनच्या खरेदीवर स्पेशल ऑफरची घोषणा करताना 8,399 रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध केला होता. आता सॅमसंग कंपनीनेही अधिकृतपणे या फोनच्या किंमतीत कपात केली आहे.
नवीन किंमतीत सॅमसंगच्या वेबसाइटवर हा फोन उपलब्ध झाला आहे. सॅमसंगने जून महिन्यात Galaxy M01 भारतात लॉंच केला. ब्लॅक, ब्लू आणि रेड अशा तीन कलरच्या पर्यायांमध्ये Galaxy M01 येतो. केवळ 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे.
Samsung Galaxy M01 फीचर्स :-
या बजेट फोनमध्ये 5.7 इंचाचा एचडी+ इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले असून 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे. फोनमध्ये 32 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, पण माइक्रोएसडी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते. या डिव्हाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर फोनच्या मागे ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 13 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे.
तर, 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 4G VoLTE सपोर्टशिवाय जीपीएस/ए-जीपीएस एफएम रेडिओ यांसारखे फीचर्स आहेत. तर, कनेक्टिव्हिटीसाठी माइक्रो-युएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळेल.