Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सॅमसंगने Galaxy A51 च्या किंमतीत केली कपात

webdunia
शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (08:40 IST)
सॅमसंग ने अलीकडेच Galaxy A51चा हाय अंट व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. याबाबतची माहिती कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर केली आहे. आता Samsung Galaxy A51 २२ हजार ४९९ रुपयांच्या किंमतीसह युजर्सना खरेदी करता येईल. नवीन किंमतीसह हा कंपनीच्या वेबासाईटवर देखील लिस्ट झाला आहे.
 
Samsung Galaxy A51 चे 6GB रॅम मॉडेलची ओरिजनल किंमत २५ हजार २५० रुपये आहे. पण कंपनीने ट्विटर अकाऊंटवर हा व्हेरिएंट आता २२ हजार ४९९ रुपयात उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली आहे. याची किंमत २३ हजार ९९ रुपये कमी केली असून या किंमतीसह हा वेबासाईटवर लिस्टेड आहे. परंतु असा खुलासा केला आहे की, HSBC आणि SBI क्रेडिड कार्डवर १ हजार ५०० रुपये कॅशबॅक दिला जात आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत २२ हजार ४९९ रुपयांवर येते.
 
तसेच 8GB रॅम मॉडेलची किंमतीत २ हजार रुपयांची कपात करण्यात आली असून हा स्मार्टफोन २७ हजार ९९९ रुपयांऐवजी २५ हजार ९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिएंटची नवीन किंमत आणि ऑफर्स डिटेलसह कंपनीने साईटवर लिस्ट केल्या आहेत. युजर्स हा स्मार्टफोन सॅमसंग व्यतिरिक्त इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि सॅमसंगच्या ई-स्टोअर्सवर खरेदी करू शकतात. Galaxy A51 प्रिझम क्रश ब्लॅक, प्रिझम क्रश व्हाईट, हेज क्रश सिल्वर आणि प्रिझम ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
 
Samsung Galaxy A51 मध्ये ६.५ इंचाच सुपर एमोलेड Infinity-O डिस्प्ले दिला गेला आहे. हा स्मार्टफोन Exynos 9611 चिपसेटवर काम करतोय. मायक्रोएसडी कार्डचा वापर करून त्यातील दोन्ही प्रकारचे स्टोरेज 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP प्राइमरी सेन्सर, 12MP चा अल्ट्रा व्हाईड अँगल, 5MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 5MP चा डेप्थ सेंसर आहे. फोनमध्ये युजर्सला 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी यामध्ये 4,000mAh बॅटरी दिली गेली आहे. जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

एअर इंडियाचं विमान केरळच्या कोझिकोड विमानतळावर घसरलं, विमानात १९१ प्रवासी