फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओमध्ये तब्बल 5.7 बिलियन म्हणजे जवळपास 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. फेसबुक रिलायंस जियोच्या 9.99 टक्के भागीदारीने व्हाट्सअॅपद्वारे 3 कोटी लहान किराणा व्यापार्यांना जियो मार्ट प्लेटफॉर्मने जोडणार आहे.
ही डील जियो मार्ट प्लेटफॉर्मवर रिटेल व्यवसाय वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. JioMart द्वारे रिलायंस रिटेल अमेजन आणि फ्लिपकार्टच्या टक्करचे प्रॉडक्ट तयार करत आहे.
रिलायंसप्रमाणे लहान किरणा व्यपार्यांना JioMart सह पार्टनरशिपचा फायदा मिळेल.
आरआयएलने म्हटले की या गुंतवणुकीसह जिओ प्लेटफार्म्स, रिलायंस रिटेल लिमिटेड आणि व्हाट्सअॅप यांच्यात एक व्यावसायिक भागीदारी करार झाला आहे. या अंतर्गत व्हाट्सअॅप वापरून जियो मार्ट प्लेटफार्मवर रिलायंस रिटेलच्या नवीन व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल आणि व्हाट्सअॅपवर छोट्या व्यावसायिकांना पाठबळ मिळेल.
जियो मार्ट ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी दुकानदार आणि किरणा स्टोअरची मदत करतं. आरआयएलप्रमाणे या करारासाठी अद्याप नियामक व इतर मान्यता प्राप्त होणे बाकी आहे.
जिओ प्लेटफार्म्स, रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) च्या पूर्ण स्वामित्व असलेली डिजीटल सेवा प्रदान करणारी सहायक कंपनी आहे. याच्या ग्राहकांची संख्या 38.8 कोटीहून अधिक आहे.