Publish Date: Wed, 22 Apr 2020 (12:44 IST)
Updated Date: Wed, 22 Apr 2020 (13:47 IST)
लॉकडाउनचा दुसरा टप्पा लागू केल्यानंतर केंद्राने 20 एप्रिलपासून काही क्षेत्रांना कामकाज करण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, यातून वृत्तपत्रांच्या घरपोच वितरणास परवानगी नाकारण्यात आली होती.
यासंदर्भात चर्चा केल्यानंतर सरकारने निर्णय बदलला असून, मुंबई, पुणे आणि कोरोनाग्रस्त कंटेनेंट झोन वगळून इतर ठिकाणी वृत्तपत्र वितरण करण्यास परवानगी दिली आहे. वृत्तपत्र वितरण करणार्या व्यक्तींनी हे काम करताना स्वतःच आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत.