पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. मे 2022 पासून त्यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही तेल कंपन्यांनी त्यांचे दर अपडेट केले आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली.सकाळी क्रूड तेल प्रति बॅरल 78.01 वर विकले गेले. राज्यात काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली .चला राज्यातील शहरात पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ या.
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 106.31 रुपये तर डिझेलचे दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
पुण्यात पेट्रोल प्रति लिटर 106.21 रुपये तर डिझेल 92.72 रुपये प्रतिलिटर ने मिळत आहे.
नाशिक मध्ये पेट्रोल 06.73 रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे, तर डिझेल 93.22 रुपये प्रतिलिटर ने मिळत आहे.
नागपूर मध्ये पेट्रोलचे दर 106.04 रुपये तर डिझेलचे दर 92.59 रुपये प्रति लिटर आहे .
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर मिळत आहे.