नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजार पेठ असलेल्या लासलगाव मधील कृषी उत्पन्न बाजार समिती १ एप्रिल ते ४ एप्रिल असे चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे कांद्यासह अन्य धान्याचे कुठलेही लिलाव होणार नाही. व्यापाऱ्यानी आगामी बँकांच्या सुट्टया तसेच महावीर जयंतीच्या निमित्ताने बाजार समितीला या संदर्भात केलेल्या विनंती नुसार बाजार समिती मधील सर्व व्यवहार बंद राहणार आहे.
आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यापारी चार ते पाच दिवस लिलाव बंद ठेवत असता, मात्र ३१ मार्च पर्यंत सरकारी अनुदानाचा लाभ शेतक-यांना मिळावा म्हणून व्यापाऱ्यानी ३१ मार्चपर्यंत लिलाव सुरु ठेवले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor