एसबीआय बँकेने बँकेत पेन्शनधारकांना लाईफ सर्टीफिकेट जमा करण्यास सांगितलं आहे. जर हे सर्टिफिकेट जमा केलं नाही तर पेन्शनधारक आपल्या अकाऊंटमधून पैसे काढू शकणार नाहीत. नोव्हेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे महिना अखेरपर्यंत पेन्शनधारकांना आपलं लाईफ सर्टीफिकेट जमा करावं लागणार आहे.
एसबीआय देशातील सर्वात मोठी बँक आहे आणि देशभरातील सर्वाधीक पेन्शन अकाऊंट याच बँकेत आहेत. बँकेच्या मते, त्यांच्याकडे जवळपास ३६ लाख पेन्शन अकाऊंट्स आहेत आणि १४ सेंट्रलाइज्ड पेन्शन प्रोसेसिंग सेलही आहे. याबाबत बँकेने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारकांनी आपलं लाईफ सर्टिफिकेट जमा नाही केलं तर, नोव्हेंबरनंतर त्यांची पेन्शन थांबवण्यात येईल. नियमांनुसार, नोव्हेंबरमध्ये सर्व पेन्शनधारकांनी आपलं लाईफ सर्टीफिकेट जमा करणं गरजेचं असतं. केवळ SBIच्या पेन्शनधारकांसाठी हा नियम लागु नाहीये तर, इतरही बँकेच्या पेन्शनधारकांना हा नियम लागू आहे.