Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त

दिलासादायक बातमी : एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त
, बुधवार, 1 एप्रिल 2020 (19:49 IST)
एलपीजी गॅस सिलेंडर सुमारे ६० रुपयांनी स्वस्त झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याची घोषणा केली. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या घोषणेनुसार, दिल्लीत एलपीजी सिलेंडर ६१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यामुळे याची किंमत ७४४ रुपये असेल. तर मुंबईत गॅस सिलेंडर ६२ रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची किंमत ७१४.५० रुपये असेल.
 
या नव्या दरांनुसार देशातील चार महानगरांमधील दर असे असतील-
 
दिल्ली – ७४४.०० (नवा दर), ८०५.५० (जुना दर)
कोलकाता – ७७४.५० (नवा दर), ८३९.५० (जुना दर)
मुंबई – ७१४.५० (नवा दर), ७७६.५० (जुना दर)
चेन्नई – ७६१.५० (नवा दर), ८२६.०० (जुना दर)
देशातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी ३० मार्च रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची घोषणा केली होती. यामध्ये जर करोनामुळे सिलेंडर घरोघरी पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास ५ लाख रुपयांचे मदत देण्याची घोषणा केली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल