Publish Date: Tue, 04 Jul 2023 (09:57 IST)
Updated Date: Tue, 04 Jul 2023 (10:02 IST)
LPG cylinder prices increased सामान्यतः तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात. 1 जुलै 2023 रोजी यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता, मात्र तीन दिवसांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवून कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 7 रुपयांनी वाढल्या आहेत. यानंतर, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची दिल्ली किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
webdunia
Publish Date: Tue, 04 Jul 2023 (09:57 IST)
Updated Date: Tue, 04 Jul 2023 (10:02 IST)