Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मारुती- सुझुकीने १ लाखांहून अधिक गाड्या परत मागवल्या

webdunia
गुरूवार, 16 जुलै 2020 (09:10 IST)
मारुती- सुझुकी कंपनीने १.३४ लाखांहून जास्त गाड्या माघारी मागवल्या आहेत. कंपनीने ‘रिकॉल’ केलेल्या सर्व वॅगनआर आणि बलेनो कार आहेत. या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये  दोष असल्यामुळे गाड्या माघारी मागवल्या आहेत.
 
एक लिटर पेट्रोल इंजिन Wagon R च्या ५६ हजार ६६३ कार परत मागवण्यात आल्या आहेत. या वॅगन आर कार १५ नोव्हेंबर २०१८ ते १५ ऑक्टोबर २०१९ दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत. तर ७८ हजार २२२ बॅलेनो कार माघारी घेतल्या आहेत. या बॅलेनो कार ८ जानेवारी २०१९ ते ४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान मॅन्युफॅक्चर झाल्या आहेत. 
 
या गाड्यांच्या फ्युअल पंपमध्ये दोष असल्यामुळे गाड्या माघारी घेण्यात आल्या आहेत. यासाठी कंपनीने डिलर्सना ग्राहकांशी संपर्क करण्यास सांगितले आहे. फ्युअल पंपमध्ये दोष असल्यास तो दूर करुन ग्राहकांना गाड्या परत केल्या जाणार आहेत. यासाठी ग्राहकांकाडून पैसे आकारले जाणार नाहीत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

महत्वाची बातमी, बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या