भारतासह जगात महागाई ही मोठी समस्या बनली आहे. सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी जगभरात विविध पावले उचलली जात आहेत. भारत सरकारने आतापर्यंत असे कोणते निर्णय घेतले, ज्यातून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जाणून घेऊया सरकारच्या 5 महत्त्वाच्या निर्णयांबद्दल.
सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने सरकारचे एक लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे.
सरकारने पोलाद आणि प्लास्टिक उद्योगासाठी प्रमुख कच्चा माल आणि इनपुटवरील आयात शुल्क देखील कमी केले. याशिवाय सरकारने सिमेंटचे दर कमी करण्याची योजना आखली आहे.
सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षात 2 दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि क्रूड सूर्यफूल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होतील.
उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडीही दिली आहे. याचा फायदा सुमारे नऊ कोटी लाभार्थ्यांना होणार आहे.
साखर निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना १.१ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त खत अनुदानही जाहीर करण्यात आले आहे.