Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनोखे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनोखे आंदोलन
, मंगळवार, 28 ऑगस्ट 2018 (15:24 IST)
सतत इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईच्या वतीने अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी नागरिकांना कमळाचे काळे फूल देऊन सरकारचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीमध्ये 'विक्रमी' कामगिरी केली असून पेट्रोलच्या दराने पेट घेतला आहे. पेट्रोल प्रतिलिटर ८५ रुपयांवर गेले आहे, तर डिझेलचा भडका ७३ रुपये प्रतिलिटरवर पोहचला आहे. मुंबईसारख्या शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांना उच्चांक गाठला असून पेट्रोल-डिझेलच्या या दरवाढीचा थेट फटका जनतेला बसत असल्याने हे आंदोलन केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
 
या आंदोलनाबाबत बोलताना माजी मंत्री सचिन अहिर म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलचे भाववाढ करून सरकारने मुंबईकरांवर महागाईचा आणखी एक मोठा बोजा टाकला आहे. भाजप- शिवसेना युती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच हे झाले आहे असा आरोप त्यांनी केला. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर थोडे कमी झाले होते तेव्हा भाजपने त्याची मोठी जाहिरातबाजी केली होती मात्र आज दरांनी उच्चांक गाठला आहे त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. सरकारमधील लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनाही आम्ही कमळाचे काळे फूल पाठवणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पी व्ही सिंधू ने जिंकले रौप्य पदक, रचला इतिहास