देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने देशभरात आपल्या 1300 शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड यात बदल केले आहे. बँकेने सर्व 1300 ब्रांचेसच्या परिवर्तित नाव आणि IFSC कोड ची माहिती वेबसाइटवर उपलब्ध केली आहे.
भारतीय महिला बँकेसह 6 एसोसिएट बँकांचे विलय झाल्यानंतर एसबीआयने हे पाऊल उचलले आहेत. हे विलय 1 एप्रिल 2017 पासून अमलात आले होते.
हा विलयानंतर एसबीआय विश्वातील शीर्ष बँकांच्या यादीत 53 व्या क्रमांकावर आहे. पूर्ण देशात एसबीआयच्या 22,428 ब्रांचेस आहे आणि ही देशातील सर्वात मोठी बँक आहे.