Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' बँकेतील खाती बंद करण्यात येणार

'या' बँकेतील खाती बंद करण्यात येणार
, शनिवार, 14 मार्च 2020 (17:33 IST)
सार्वजनिक महामंडळांनी राष्ट्रीयकृत बँकेतच पैसे जमा करावेत, असा राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. १ एप्रिलपासून खासगी तसेच सहकारी बँकेतील खाती बंद करण्यात येणार आहेत. 
 
सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे आदींनी त्यांच्याकडील सर्व बँकिंग विषयक व्यवहार राष्ट्रीयकृत बँकांमार्फतच करण्यात यावेत. तसेच यापूर्वी खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकांमध्ये कोणत्याही शासकीय योजनांचा निधी (वेतन व भत्ते व्यतिरिक्त) जमा करण्यासाठी उघडण्यात आलेली बँक खाती १ एप्रिल, २०२०पासून बंद करावीत. आणि केवळ राष्ट्रीयकृत बँकांमध्येच खाती उघडावीत, असे या शासन परिपत्रकात म्हटले आहे. 
 
१ एप्रिल, २०२०पासून कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते यासाठी केवळ राष्ट्रीयकृत बँकांमधील खात्यात जमा करण्याचे स्पष्ट म्हटले आहे. तर निवृत्ती वेतनधारकांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांची बँक खाती त्यांच्या सोयीच्या दृष्टीने खासगी अथवा सहकारी क्षेत्रातील बँकामध्ये उघडली आहेत. तथापि, त्यांनीही निवृत्ती वेतन बँक खाती राष्ट्रीयकृत बँकामध्येच उघडण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वेची 'ही' आहे उपाययोजना