विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज १ ऑगस्टपासून नवे दर लागू होतील. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या दरात झालेले बदल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयांची स्थिती सुधारल्याने या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना आतापर्यंत ६३७ रुपये मोजावे लागत होते. त्यामध्ये आता बदल करण्यात आला असून, नवे दर ५७४.५० रुपये इतका असणार आहे. १ ऑगस्टपासूनच नवे दर लागू होणार आहेत. यापूर्वी ३० जूनला विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा कपात करण्यात आल्यामुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.