पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसतोय तसा तो राज्याच्या सीमाभागातील पेट्रोलपंप मालकांनाही बसतोय. याचा परिणाम प्रामुख्यानं गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर दिसून येतोय. महाराष्ट्र आणि गुजरात ही शेजारील राज्ये असूनही दोन्ही राज्यांतील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. गुजरात राज्यात पेट्रोल ७७.१३ रूपये लीटर आहे तर महाराष्ट्रात ८५.६० रूपये लीटर.. गुजरात राज्याने पेट्रोलवरील कर कमी केल्याने येथील पेट्रोलच्या किंमती महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमे शेजारील गुजरातमधल्या पेट्रोलपंपांची चलती सुरू आहे.