Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॅनकार्ड धारकांनी पॅनकार्ड आधारला लिंक करण्याचे आदेश

पॅनकार्ड धारकांनी पॅनकार्ड आधारला लिंक करण्याचे आदेश
, बुधवार, 26 एप्रिल 2017 (12:48 IST)
आता यापुढे इन्कम टॅक्‍स रिटर्न भरण्यासाठी आधारकार्ड आणि पॅनकार्ड दोन्ही आवश्‍यक होणार आहे. यामुळे केंद्र सरकारने 1 जुलै 2017 पर्यंत सर्व पॅनकार्ड धारकांना आपले पॅनकार्ड आधारला लिंक करण्याचे आदेश दिले आहे. दरम्यात आधारकार्डाशी पॅनकार्ड लिंक करण्यात अनेक व्यक्तींना अडचण निर्माण होत आहे. अशा व्यक्ती ज्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चुका आहेत. अनेक व्यक्ती आपल्या नावाचे स्पेलिंग वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. त्यामुळे पॅनकार्डवरील नावाचे स्पेलिंग आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंगशी जुळले नाही तर असे कार्ड लिंक होत नाही. तसेच बॅंक खात्यातील नावाचे स्पेलिंग आणि आधारकार्डावरील नावाचे स्पेलिंग यात साम्य नसेल तर आधार आणि पॅन कार्ड लिंक होणार नाही. पॅनकार्ड, आधार कार्ड आणि बॅंक खात्यात दिलेली माहिती मॅच व्हायला हवी. असे नाही झाल्यास तुम्ही आपल्या पॅनकार्ड आणि आधारकार्डात बदल करण्यासाठी अर्ज करू शकतात. हा अर्ज इन्कम टॅक्‍स खात्याच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर करता येणार आहे. तसेच आधार कार्डातील माहितीतील बदल करण्यासाठी यूआयडीला आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल. तसेच यासाठी ऑनलाइन अर्जही करू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धावत्या ट्रेनमध्ये आणि शौचालयातून ट्रॅकवर पडूनही बाळ सुरक्षित