तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 76 ते 85 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही 67 ते 75 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी तर डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ झाली आहे.
मुंबईत पेट्रोलच्या दरात 85 पैशांनी तर डिझेलच्या दरात 75 पैशांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात 83 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात 76 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 67 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लदाख येथे पेट्रोलचे दर 100 रुपये असून मुंबई मध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत.