नाग किंवा सापांचे नाव ऐकूनच अंगाला काटा येतो. तर काही लोक सापाशी खेळ करतात. आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. असेच काही घडले आहे सांगली येथे. नागासोबत स्टंट करतानाचे व्हिडीओ करून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला सांगली वन विभागाने अटक केली आहे. सांगलीतील वाळवा तालुक्यातील मौजे बावचीतील राहणारा तरुण प्रदीप अशोक अडसुळे वय वर्ष 22 या तरुणाने नागासोबत स्टंट केल्याचे अनेक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लागली आणि त्यांनी वन्य जीव संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत प्रदीप वर गुन्हा दाखल केले असून त्याला अटक केली आहे.
सांगलीतील प्रदीप अडसुळे हा तरुण नागाला पकडून त्यांच्या सोबत जीवघेणे स्टंट करून त्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करायचा त्यावर त्याला कॉमेंट्स आणि लाइक्स मिळायचे. दिवसेंदिवस त्याच्या व्हिडिओला लाईक्स आणि कॉमेंट्स करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत गेली आणि त्याला अजून व्हिडीओ करण्याचा नाद लागला.
त्याने शेअर केलेले व्हिडीओ मध्ये नागासोबत केलेले स्टंट जीवघेणे असून त्यात त्याचा जीव जाऊ शकतो. हा तरुण अशा प्रकारे नागासोबत स्टंट करण्याची माहिती सांगली वन विभागाला लागल्यावर त्यांनी त्याचा वर गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करत आहे.