Petrol Diesel Price Today 11th July: पेट्रोल-डिझेलचे दर रविवारी विक्रमी उच्च स्तरावर स्थिर राहिले. यापूर्वी शनिवारी त्यांच्या किंमती वाढविण्यात आल्या. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत आज 100.91 रुपये आणि डिझेलची किंमत 89.88 रुपये प्रतिलिटर इतकी आहे. पश्चिम बंगाल व इतर चार राज्यांमधील निवडणुका झाल्यानंतर त्यांच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्याचा सध्याचा क्रम 4 मेपासून सुरू झाला. दिल्लीत मे आणि जूनमध्ये पेट्रोल 8.41 रुपयांनी तर डिझेल 8.45 रुपयांनी महागले होते. जुलै महिन्यात आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 2.10 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 72 पैसे वाढ झाली आहे.
देशातील इतर शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोल 106.93 रुपये तर डिझेल प्रति लिटर 97.46 रुपये मिळाले. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.67 रुपये होती तर डिझेलची किंमत 94.39 रुपये होती. कोलकातामध्ये पेट्रोल 101.01 रुपये तर डिझेल 92.97 रुपये प्रति लिटर कायम आहे.