कोणताही नियम अथवा कोणतेही बंदी नसताना शासन आणि रिजर्व बँकेचे कोणतेही धोरण नसताना केवळ अफवेच्या आधारावर १० रु. कॉईन व्यापारी आणि इतर लोक घेत नाहीत. त्यात बँकांची भर पडली आहे.
ग्राहक आमच्याकडून दहा रुपयांचे कॉईन घेत नाहीत, म्हणून आम्हीही ते घेणार नाही, असं अजब स्पष्टीकरण बँक ऑफ ईंडियाने ग्राहकाला दिले आहे. त्यामुळे आधिच अडचणीत असलेले आणि बँकेमुळे अधिक संतप्त झालेल्या दोन शेतकऱ्यांनी बँकेच्या समोरच ठिय्या आनोदालन केले आहे.
शिवाजी वाघ आणि नामदेव वाघ या दोघांनी आपल्या जवळील असलेले 10 हजार रुपयांचे 7 हजार कॉईन या शेतकऱ्यांनी बँकेसमोर टाकले आहेत. रोज 100 रुपयेच घेऊ, म्हणजे 7 हजार रुपये भरण्यासाठी 70 वेळा बँकेत या, असं बँकेचं म्हणणं आहे.
कोणतेही आदेश नसताना असे वागल्याने ग्राहक अडचणीत सापडला आहे.