Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किरकोळ किंमतीवरील महागाई नियंत्रणात

किरकोळ किंमतीवरील महागाई नियंत्रणात
, शुक्रवार, 14 जुलै 2017 (08:14 IST)
महागाई रोखण्यात सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला आता चांगलेच यश आले आहे. मात्र औद्योगिक उत्पादनाच्या आघाडीवर मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. सरकारच्या सांख्यीकी विभागाने काल जून महिन्यासाठीची किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या महागाईचा दर केवळ 1.54 टक्के इतका मोजला गेला आहे. जो की मे महिन्यात 2.18 टक्के सतका होता.
 
सरकारने मे महिन्यातील औद्यागिक उत्कादनवाढीची आकडेवारीही जाहीर केली आहे. यानुसार औद्योगिक उत्पादन केवळ 1.7 टक्‍क्‍यानी वाढले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मात्र औद्योगिक उत्पादन तब्बल 8 टक्‍क्‍यानी वाढले होते.
 
महागाई कमी असूनही रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कपात केली नाही. त्यामुळे औद्योगिक उत्पादनावर नकारात्मक परिणाम कायम आहे. आता बॅंकेने शक्‍य तितक्‍या लवकर व्याजदरात कपात करण्याची गरज असल्याचे उद्योजकांच्या संघटनानी म्हटले आहे.
 
त्याचबरोबर विश्‍लेषक संस्थानीही गेल्या आठवठ्यात रिझर्व्ह बॅंक आता पुढील पतधोरणात व्याजदरात कपात करण्याची शक्‍यता असल्याचे सांगीतले आहे. आज अँजेल ब्रोकींगचे वैभव अगरवाल यानी सांगीतले की महागाईचा कमी झालेला दर पाहता रिझर्व्ह बॅंकेला आता व्याजदरात कपात करण्यास वाव आहे. त्याशिवाय खासगी गुंतवणूक वाढून औद्योगिक उत्पादन वाढण्यास चालना मिळणार नाही. मात्र अमेरीकेचे फडरल रिझर्व्ह आपला ताळेबंद किती आखडता घेते याकडे रिझर्व्ह बॅंकेचे लक्ष राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विम्बल्डन : फेडररची कामगिरी हेच उपान्त्य फेरीचे आकर्षण