महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे नियमात केंद्रीय भुपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाच्या 29 डिसेंबर 2016 च्या अधिसुचनेनुसार वाढ करण्यात आली असून अधिसूचनेची त्वरीत प्रभावाने अंमजबजावणी सुरू करण्यात आली आहे.
नवीन शुल्क रचेनप्रमाणे शिकाऊ अनूज्ञप्ती शुल्क रु. 150 (प्रत्येक संवर्गासाठी ), शिकाऊ अनुज्ञप्ती पुर्नचाचणी 50, अनूज्ञप्ती चाचणी 300(प्रत्येक संवगर्साठी ), नवीन वाहन अनुज्ञप्ती 200, नवीन आतंरराष्ट्र्रीय अनुज्ञप्ती 1000, अनुज्ञप्तीत वर्ग वाढवणे 500, धोकादायक मालवाहतुक करणाऱ्या वाहनांची अनुज्ञप्ती 100, अनुज्ञप्ती नुतनीकरण 200(वैधता संपल्यानंतर 300), वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला नविन लायसन्य देणे अथावा नुतनीकरण करणे 10000, वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला दुय्यम लायसन्य देणे 5000, अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्याच्या आदेशाविरूध्द अपिल करणे 500, वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्तीत पत्ता किंवा इतर कोणत्याही तपशीलामध्ये बदल करणे 200, स्मार्टकार्ड स्वरूपातील अनुज्ञप्तीसाठी शुल्क रु. 200 अधिक सेवाकर आकारण्यात येणार आहे