Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण
, शुक्रवार, 29 जून 2018 (08:56 IST)
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सध्या सुरूच आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत रुपया २८ पैशांनी खाली म्हणजे ६८.८९ रुपये प्रति डॉलरवर खुला झाला आणि त्यानंतर घसरण सुरूच राहिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम रुपयावर दिसत असून ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
कच्चे तेल आणि डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाची घसरण सातत्यानं सुरू आहे. दिवसाच्या सुरुवातीच्या भागात रुपयात घसरण वाढली आहे. आता डॉलरच्या तुलनेत रुपया ६९.०९च्या स्तरावर पोहोचला आहे. या आधी बुधवारी रुपया १९ पैशांनी खाली आला होता. ६८.४३ रुपये प्रति डॉलर कारभाराला सुरुवात झाली होती.
 
मंगळवारी दिवसाचा कारभार संपताना रुपया डॉलरच्या तुलनेत ११ पैशांची घसरण पाहायला मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया ६८.२४च्या स्तरावर पोहोचला होता. नोव्हेंबर, २०१६ नंतर पहिल्यांदाच रुपया डॉलरच्या तुलनेत इतका खाली उतरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम शेअर बाजरावर पाहायला मिळाला आहे. शेअर बाजारात ३५.७६ अंकांची घसरण दिसून आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिजिटल डिव्हाइसच्या वापराने नात्यातील प्रेम वाढतं की कटुता?