Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसबीआयच्या मुदत ठेव योजनांवरील व्याजदर वाढले

एसबीआयच्या मुदत ठेव योजनांवरील व्याजदर वाढले
भारतीय स्टेट बँकेकडून निवडक मुदत ठेव योजनांवरील व्याजदर वाढवण्यात आले. व्याजदरात पाच बेसिक पॉइंट्सची वाढ करण्यात आली असून त्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता एफडीवर ६.८ टक्के व्याज मिळणार आहे. यापैकी काही योजनांचे व्याजदर हे एक ते दोन वर्षे तर उर्वरित योजनांचे व्याजदर दोन ते तीन वर्षांसाठी लागू असतील.  
 
जुलैमध्ये स्टेट बँकेने तो पाच बेसिक पॉइंट्सने वाढवून ६.७५ टक्के इतका केला होता. आता तो परत पाच बेसिक पाँइंट्सने वाढवण्यात आला आहे. एकाच वर्षात दोनदा दरवाढ केली गेल्याचीही पहिलीच वेळ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षणाला कुठलाच विरोध नाही : भुजबळ