Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेअर चॅट शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म Max TakaTak खरेदी करणार

शेअर चॅट शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म Max TakaTak खरेदी करणार
, शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (17:09 IST)
भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअरचॅट ने लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्म MX Takatak खरेदी करण्यासाठी करार केला आहे. या दोन्ही कंपनी मध्ये धोरणात्मक विलीनीकरणाची घोषणा केली, ज्या मुळे भारतीयांसाठी सर्वात मोठा लघु व्हिडीओ प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. ज्या द्वारे आता दोन्ही प्लॅटफॉर्म शेअर चॅट द्वारे नियंत्रित केला जाईल. एका अहवालानुसार, दोन्ही कंपन्यांनी हा करार $600 दशलक्षसाठी केला आहे, ज्यामध्ये रोख आणि शेअर्सचा समावेश आहे. सुमारे सहा महिन्यांत एमएक्स टाकटकचे पुनर्ब्रँडिंग केले जाईल, असे अहवालात म्हटले आहे. महिना अखेरीस हा करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 
 
या डीलमुळे शॉर्ट व्हिडिओ क्षेत्रात शेअरचॅटची स्थिती मजबूत होईल. त्याच्याकडे आधीपासूनच मजा उपलब्ध आहे, ज्यांच्या मासिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 160 दशलक्ष आहे. MX Takatak च्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 150 दशलक्ष आहे. एकत्रितपणे, वापरकर्त्यांची संख्या 300 दशलक्षांपेक्षा जास्त होईल. सध्या शेअर चॅट चे स्थानिक प्रतिस्पर्धी जोशचे 115 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आईने मुलाला 10 व्या मजल्यावर लटकवलं ,कारण जाणून आपण थक्कच व्हाल !