Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वीस बँकेतील 'ते' 300 कोटी रुपये कुणाचे?

स्वीस बँकेतील 'ते' 300 कोटी रुपये कुणाचे?
नवी दिल्ली , मंगळवार, 17 जुलै 2018 (12:29 IST)
स्वीस बँकेतील काळ्या पैशांवरून भारतात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत आरोप-प्रत्यारोप चालू आहेत, परंतु, स्वीस बँकेत काही खाती निष्क्रिय असून यातील 300 कोटी रुपये कुणाचे आहेत, हे सांगण्यासाठी अद्याप कुणीही समोर आला नाही. गेल्या तीन वर्षांपासून बँक याच्या प्रतीक्षेत आहे. दोन वर्षांपर्यंत या खात्यावर कोणीही दावा सांगितला नाही तर ही खाती दोनवर्षांनंतर गोठवण्यात येणार असल्याची माहिती बँकेनी दिली आहे.
 
स्वीत्झर्लंडमधील बँकांची देखरेख करणार्‍या संस्थेने डिसेंबर 2015 साली पहिल्यांदा या खात्याची यादी प्रसिद्ध केली होती. स्वीत्झर्लंडने प्रसिद्ध केलेल्या आकड्यानुसार, 6 भारतीय निष्क्रिय खाती असून तीन खाती ही भारतीय आहेत. परंतु, ते सध्या भारतात नाही तर अन्य देशात राहतात. या खात्यात एकूण 4.4 कोटी स्वीस फ्रँक म्हणजेच 300 कोटी रुपये इतका पैसा आहे. ही खाती भारताशी संबंधित आहेत. यादीत समावेश असलेली ही खाती 2020 पर्यंत ठेवणार आहेत, तोपर्यंत या खात्यांवर दावा सांगता येईल. त्यानंतर ही खाती गोठवण्यात येतील व यादीतून बाद करण्यात येईल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
 
या यादीत अन्य सुद्धा खाती असून यात 500 स्वीस फ्रँक आहे आणि 60 वर्षांपासून यावर कोणीही दावा सांगितला नाही, यात स्वीत्झर्लंडमधील लोकांची मोठी संख्या आहे. तसेच जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, यूएस, तुर्की, ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांमधील नागरिकांचा समावेश आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाँद तारा असलेला हिरवा झेंडा ताण वाढवतो, शिया वक्फ बोर्डाची झेंडे हटवण्याची मागणी