Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकच्या सिडको कार्यालयाबाबत शासनाने नव्याने दिले “हे” आदेश

cidco
, गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (08:18 IST)
नाशिक शहरात असलेले सिडको कार्यालय बंद करण्याचा आदेश शासनाने काढला होता. परंतु सर्वच राजकीय पक्षांनी याला विरोध दर्शवून कार्यालय बंद करु नये असे मेल शासनाला केल्याने कार्यालय बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. याबाबत अवर सचिव समाधान खटकाळे यांनी आदेश दिले आहे.
 
या पत्रात असे नमूद केले आहे की, नाशिक येथील कार्यालय बंद करुन तेथील अधिकारी / कर्मचारी यांची इतरत्र रिक्त पदांनुसार पदस्थापना देणेबाबत कळविण्यात आले आहे. तथापि , सिडकोने भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनी, लिज होल्ड ते फ्री होल्डसम करण्याची व इतर अनुषंगिक बाबींची कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.
 
सदर बाब विचारात घेता , संदर्भाधीन पत्रामध्ये सुधारणा करुन आपणास कळविण्यात येते की , सदर कामाकरीता आवश्यक असणारा कमीत कमी लिपीक वर्गीय कर्मचारी वर्ग नाशिक कार्यालयात कायम ठेवावा . परंतु , अन्य अधिकारी / कर्मचारी , विशेषतः तांत्रिक संवर्ग, यांना आवश्यकतेनुसार इतरत्र पदस्थापना देण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे असा आदेश दिला आहे.
 
या आदेशामुळे सिडकोचे कार्यालय बंद होण्याचा विषय थांबला आहे. सर्व राजकीय पक्षांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिमुकलीचा रुग्णवाहिकेतच गळा दाबून खून; निर्दयी आईला पोलिसांकडून अटक