रोजच्या भाज्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या टोमॅटोने तर किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे. त्यामुळेच देशाची राजधानी दिल्लीतही त्याची किंमत 100 रुपये किलोवर पोहोचली आहे. दक्षिण भारतात ते थोडे जास्तच महागले आहे. चेन्नईमध्ये 160 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. वास्तविक सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात विवाह होत आहेत. त्यामुळे टोमॅटोचा खप वाढला आहे.
प्रमुख भाज्यांचेही दर वाढलेयत. भेंडी वांगी, ढोबळी मिरची किलोला ६० ते ८० रुपये दरानं विकल्या जात आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी पन्नाशी पार केल्याचं चित्र सध्या सगळीकडे दिसत आहे.