Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समता परिषदेसह ओबीसी संघटनांच्या वतीने नाशिकच्या द्वारका चौकात रास्ता रोको ; शेकडो कार्यकर्त्यांना अटक

समता परिषदेसह ओबीसी संघटनांच्या वतीने नाशिकच्या द्वारका चौकात रास्ता रोको ; शेकडो कार्यकर्त्यांना अटक
, गुरूवार, 17 जून 2021 (19:30 IST)
स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने नाशिकच्या द्वारका चौकात आज तीव्र निदर्शने करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे व कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर काही काळाने त्यांची सुटका देखील करण्यात आली.
 
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कोर्टाने रद्द केल्याने समता परिषदेसह सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने आज राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश आंदोलन करत राज्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. आज नाशिक शहरातील द्वारका चौकात जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेसह विविध ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला. यावेळी ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी यासह विविध न्याय मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. 
 
यावेळी दिलीप खैरे म्हणाले की, ओबीसी समाजाचे नेते राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ हे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात सामाजिक पातळीवर सर्व ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवीत आहोत. आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालून ओबीसी समाजाला न्याय द्यावा. ओबीसींच्या मागण्याबाबत सुरु केलेली ही आमची रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरु राहील असे खैरे यांनी यावेळी सांगितले.
 
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, नगरसेवक संतोष गायकवाड, समीना मेमन, माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, कविता कर्डक, रंजना पवार, सदाशिव माळी, समाधान जाधव, योगेश कमोद, अमर वझरे, ओबीसी संघटनांचे पदाधिकारी अंबादास खैरे, श्रीराम मंडळ, अनिता भामरे, योगेश निसाळ, आशा भंदुरे, संजय खैरनार, महेश भामरे, विजय राऊत, संतोष कमोद, दिलीप तुपे, राजेंद्र आहिरे, धनंजय कमोदकर, अजय देव्हारे, मुख्तार शेख, लकी पटेल, सुधाकर गायकवाड, राजेंद्र सोननिस, ज्ञानेश्वर बोराडे, विलास बोराडे, शाम जगताप, अशोक सोनवणे, बाळासाहेब जगताप, सुधाकर टीबे, बाळासाहेब जोर्वेकर, अरविंद क्षीरसागर, नंदन भास्करे, किशोर बेलसरे, शंकर मोकळ, भालचंद्र भुजबळ, नाना पवार, उदय सराफ, गजानन घोडके, उत्तम तांबे, धनंजय निकाळे, गणेश आवनकर, बापू महाजन, ज्ञानेश्वर महाजन, रंजना गांगुर्डे, संदीप शिंदे, संदीप गांगुर्डे, सागर बेदरकर, गणेश खोडे, संतोष जगताप, विलास वाघ, आशिष हिरवे, सुशांत शिरसाठ, रवी हिरवे, हर्षल खैरणार, सचिन बोरसे, जयवंत जेजुरकर, रोहित चांडोले, दिनेश कमोद, ओमकार उदावंत, प्रथमेश पवार, राहुल जगताप, जिभाऊ आहिरे, डॉ. देवेंद्र खैरणार, रवींद्र शिंदे, शिवराज नाईक, अमित वझरे, सुमित वझरे, मयूर वझरे, राहुल घोडे, भरत जाधव, नाना साबळे, सचिन कलासरे, जितु जाधव, हरिभाऊ महाजन, जुनेद शेख यांच्यासह ओबीसी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी धर्मराज काथवटे यांनी महात्मा फुलेंचा पेहराव करत सर्वांचे लक्ष वेधले.
 
ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलकांकडून विविध घोषणा 
यावेळी आंदोलकांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे, जय ज्योती जय क्रांती, ओबीसीचे राजकीय आरक्षण, हा आमचा हक्क आहे. हक्काचे आरक्षण आमची  चळवळ, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींच पक्के आह, ओबसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा, नही चलेगी नही चलेगी दादागिरी, नही चलेगी, ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तढा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा यासह विविध घोषणा यावेळी आंदोलकांच्या वतीने यावेळी देण्यात आल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्याला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका, कोविड टास्क फोर्सने केलं सावध