Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत : संजय राऊत

हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत : संजय राऊत
, गुरूवार, 17 जून 2021 (16:37 IST)
मुंबईत शिवसेना भवनासमोर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी तिथे आलेले शिवसेना कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यामध्ये आधी वाद आणि त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्य झालं. यावर शिवसेनेकडून गुंडगिरी सुरू असल्याची टीका झाल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “होय, आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
 
शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्यानंतर मोठा राडा झाला. या प्रकरणी माहीम पोलीस स्थानका गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊतांना विचारणा केली असता त्यांनी विरोधकांना परखड शब्दांमध्ये सुनावलं आहे. “होय शिवसेना गुंडगिरी करते. पण त्याला सत्तेचा माज म्हणणं चुकीचं आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे”, असं राऊत म्हणाले आहेत.
 
दरम्यान, यावर बोलताना संजय राऊत यांनी “विरोधी पक्षांना आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे. पण आंदोलन करताना तुम्ही आमची जी श्रद्धास्थानं आहेत, त्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल, तर ते सहन होणार नाही. कालचा प्रकार दुर्दैवी जरी असला, तरी त्याशिवाय पर्याय नव्हता. शिवसेना भवनासमोर आंदोलन नाही करायचं. ते ठिकाण महाराष्ट्रात आणि देशात अपवाद आहे”, असं ते म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माजी आमदार डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतणार