Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र सरकारमध्ये भाजप शिवसेनेला गडी मानत असायची -संजय राऊत

महाराष्ट्र सरकारमध्ये भाजप शिवसेनेला गडी मानत असायची  -संजय राऊत
, रविवार, 13 जून 2021 (18:00 IST)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आरोप लावला आहे की महाराष्ट्रात  2014 ते 2019 या काळात जेव्हा पक्षाची सत्ता होती तेव्हा गुलामांसारखी वागणूक दिली जात असे आणि राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न केला जात असे .
 
शनिवारी उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना राऊत म्हणाले की, मागील सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम दर्जा दिला जात होता आणि त्यांना गुलाम म्हणून मानायचे .आमच्या पाठिंब्यामुळे मिळविलेल्या शक्तीचा गैरवापर करून आमच्या पक्षाला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
राऊत यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीत भेट दिली होती, त्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळाचे वातावरण तापले होते.
 
2019 मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप युती तुटली. शिवसेना ही भाजपच्या जुन्या मित्रपक्षांपैकी एक होती. नंतर त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस (राष्ट्रवादी) आणि कॉंग्रेसबरोबर अनपेक्षित युती करुन सरकार स्थापन केले.
 
राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा अशी त्यांची नेहमीची भावना होती. "शिवसैनिकांना काहीही मिळाले नसले तरी राज्याचे नेतृत्व शिवसेनेच्या ताब्यात असल्याचे आपण अभिमानाने सांगू शकतो. याच भावनेने (नोव्हेंबर 2019 मध्ये) महा विकास आघाडी (एमव्हीए) सरकार स्थापन केले गेले.
 
विधानसभा निवडणुकीनंतर नोव्हेंबर 2019 मध्ये त्रिपक्षीय सरकार स्थापनेपूर्वी झालेल्या घडामोडी आठवत राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी काही काळ बाजू मांडणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आता एमव्हीए चे प्रबळ प्रवक्ता आहेत.
 
फडणवीस यांच्या नेतृत्वात अजितदादांनी बनवलेली  दुसरी सरकार केवळ 80 तास चालली. राऊत म्हणाले, राजकारणात काहीही घडू शकत . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता,एक लीटर पेट्रोल आणि ते ही फक्त 1 रुपयांत