Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता,एक लीटर पेट्रोल आणि ते ही फक्त 1 रुपयांत

काय सांगता,एक लीटर पेट्रोल आणि ते ही फक्त 1 रुपयांत
, रविवार, 13 जून 2021 (16:32 IST)
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्ते डोंबिवलीत युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून डोंबिवलीच्या उस्मा पेट्रोलपंपावर माफक दरात पेट्रोलचे वाटप केले जात आहे. आणि पेट्रोलचे दर म्हणजे चक्क 1 रुपया आणि या 1 रुपयांत 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे त्यामुळे डोंबिवलीकरांची चांदीच झाली आहे. सध्या पेट्रोलचे दर 100 रुपये पेक्षा जास्त  झाले असताना या काळात 1 रुपयांत 1 लीटर पेट्रोल मिळाल्यामुळे पेट्रोलपंपाच्या बाहेर दुचाक्यांची मोठी रांग लागलेली आहे.
 
सध्या पेट्रोलचे दर खूपच वाढले आहे त्या,मुळे या साठी केंद्र सरकार जबाबदार आहे आणि या पेट्रोलवाढी दराचा मुद्दा वारंवार केंद्रसरकार पुढे शिवसेनेकडून मांडण्यात आला होता आज शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकारी योगेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त 1 रुपयांत 1 लीटर पेट्रोल देण्याचा उपक्रम केला आहे.या वेळी शहर प्रमुख राजेश मोरे आणि राजेश कदम देखील उपस्थित होते.
 
त्याच बरोबर आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ता ने शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मोफत लस देण्याचा उपक्रम  देखील राबविण्यात आला.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस 13 जूनला तर राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जूनला आहे. मात्र राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आदित्य ठाकरे यांनी देखील वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.
 
आदित्य म्हणतात की सध्या या जगावर आणि राज्यावर कोरोनाचे संकट आहे आणि कित्येक लोकांनी या कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या कोरोनावर मात करणंच आपले ध्येय आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला बघता मी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवलं आहे.आपण मला घरूनच शुभेच्छा द्यावे असे त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी! मोदी सरकारचा नवा उपक्रम, भारतात मेडिकल ड्रोन डिलिव्हरी होणार