Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

९१ टक्‍के भागधारकांना भाडेतत्त्‍वावर घर देण्‍याची स्थिती प्रबळ होण्‍याची अपेक्षा

९१ टक्‍के भागधारकांना भाडेतत्त्‍वावर घर देण्‍याची स्थिती प्रबळ होण्‍याची अपेक्षा
मुंबई , मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (16:16 IST)
नुकतेच करण्‍यात आलेल्‍या नाइट फ्रँक-फिक्‍की-एनएआरईडीसीओ - ‘रिअल इस्टेट सेंटीमेंट इंडेक्स क्‍यू४ २०१९’ अहवालामध्‍ये रिअल इस्‍टेट भागधारकांनी २०२०च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये कार्यालयीन क्षेत्रासाठी आशावादी चित्र निर्माण होण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये भारतीय कार्यालयीन क्षेत्रामध्‍ये दिसण्‍यात आलेल्‍या प्रचंड विकासामुळे हे आशावादी चित्र निर्माण झाले आहे.
 
विद्यमान बाजारपेठ ट्रेण्‍ड्समुळे कार्यालयीन बाजारपेठ स्थितीमध्‍ये सुधारणा होत आहे. २०१९ मध्‍ये माहिती तंत्रज्ञान विभागामध्‍ये भाडेतत्त्‍वावरील प्रमाणामध्‍ये वाढ झाल्‍यामुळे भाडेतत्त्‍वावर देण्‍यात आलेल्‍या कार्यालयाची जागा ५.६ दशलक्ष चौरस मीटर (६०.६ दशलक्ष चौरस फूट) इतकी उच्‍च होती. २०१९ मध्‍ये नवीन कार्यालयासाठी देण्‍यात आलेली जागा वर्षानुवर्षे ५६ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ६१.३ दशलक्ष चौरस फूट एवढी होती. ज्‍यामुळे मागणीची किरकोळ पूर्तता झाली.
 
२०१९च्‍या चौथ्‍या तिमाहीसाठी कार्यालयीन बाजारपेठ स्थिती: सकारात्‍मक गती कायम
 
भाडेतत्त्‍वावरील कार्यालयासाठी स्थितीसंदर्भात भागधारकांची भावना प्रबळ राहिली. ८८ टक्‍के प्रतिसादकांचे मत आहे की, जागा भाडेतत्त्‍वावर देण्‍याच्‍या प्रमाणामध्‍ये सुधारणा होईल किंवा समान राहिल. 
 
नवीन कार्यालयासाठी जागा भाडेतत्त्‍वावर देण्‍याची स्थिती सकारात्‍मक राहिली. ९५ टक्‍के भागधारकांना भौगोलिक क्षेत्रामध्‍ये हा पुरवठा समान राहण्‍याची किंवा वाढण्‍याची अपेक्षा आहे. 
 
भागधारकांचा भविष्‍यात कार्यालयीन भाड्यांमध्‍ये वाढ होण्‍यासंदर्भात दृष्टिकोन देखील सकारात्‍मक आहे. ९१ टक्‍के भागधारकांना उच्‍च मागणीसह लहान बाजारपेठांमध्‍ये भाडे समान राहण्‍याची किंवा वाढण्‍याची अपेक्षा आहे. 
 
नाइट फ्रँकचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक शिशिर बैजल म्‍हणाले, ''भागधारकाच्‍या कार्यालयीन विभागासाठी सेटिंमेंट्स प्रबळ का‍मगिरीमुळे उच्‍च आहेत. कार्यालयाच्‍या परवडणा-या भाडेमूल्‍यामुळे गुंतवणूकदार उत्तम भाडे उत्‍पन्‍नांसह मध्‍य ते दीर्घकाळापर्यंत गुंतवणूका करण्‍याला प्राधान्‍य देत आहेत. तसेच आमच्‍या निदर्शनास आले आहे की, गेल्‍या काही वर्षांमध्‍ये भारतातील माहिती तंत्रज्ञान विभागामधील सुधारणेमुळे दर्जेदार कार्यालयीन जागांसाठी प्रबळ मागणी निर्माण झाली आहे. भारत आता झपाट्याने उच्‍चस्‍तरीय आयटी सेवा व इंजिनीअरिंगचे केंद्र बनत आहे. देशामध्‍ये डेटा केंद्रे, आरअॅण्‍डडी केंद्रे आणि इतर महत्त्‍वपूर्ण कार्यसंचालनांचे प्रमाण वाढत आहे.''

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयसीसी टी-20 क्रमवारी विराट दहाव्या स्थानी घसरला