Publish Date: Fri, 05 Oct 2018 (16:37 IST)
Updated Date: Fri, 05 Oct 2018 (16:39 IST)
वाढती महागाई, रुपयाची पडझड आणि आरबीआयने रेपो रेट कायम ठेवल्यानंतर शेअर बाजारावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. बाजार तब्बल 915.37 अंकांनी कोसळून 34,253 वर पोहचला. तर निफ्टी 322.35 अंकांनी खाली येत 10,272 वर पोहचला आहे. यासोबत आज रुपया आणखी घसरला असून प्रति डॉलर 74 रुपये इतकी किंमत मोजावी लागत आहे.