Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूरमधील हा उड्डाणपूल आणि मेट्रोच्या सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्टची गिनीज बुकात नोंद

nitin gadkari
, मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (14:15 IST)
नागपूर  – नागपूरमध्ये सिंगल कॉलमच्या आधारावरील महामार्ग उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट (३.१४ किमी) यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका ट्विट मालिकेच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महा मेट्रो टीमचे अभिनंदन केले आहे.
 
या प्रकल्पाने एशिया बुक आणि इंडिया बुकमध्ये यापूर्वीच विक्रम नोंदवला आहे. आता हा प्रतिष्ठित सन्मान मिळणे हा आमच्यासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, असे गडकरी म्हणाले. हे घडवून आणण्यासाठी चोवीस तास प्रयत्न करणारे अतुलनीय अभियंते, अधिकारी आणि कामगारांचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना सलाम करतो , असे मंत्री म्हणाले. अशाप्रकारचा विकास म्हणजे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
 
अशी आहेत याची वैशिष्ट्ये
वर्धा रोडवरील ‘डबल डेकर व्हाया-डक्ट’ प्रकल्प राबविणे एक मोठे आव्हान होते. हा 3-स्तरीय संरचनेचा भाग आहे. ज्याच्या वरच्या बाजूला मेट्रो रेल्वे, मध्यम स्तरावर महामार्ग उड्डाणपूल आणि जमिनीच्या पातळीवर विद्यमान रस्ता आहे. ३.१४ किमीचा डबल डेकर व्हाया डक्ट ही जगातील कोणत्याही मेट्रो रेल्वे प्रणालीतील सर्वात लांब अशी रचना आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार? अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये