Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीएनजी म्हणजे काय आहे, इंधनचा उपयोग जाणून घ्या

सीएनजी म्हणजे काय आहे, इंधनचा उपयोग जाणून घ्या
, गुरूवार, 2 मार्च 2023 (16:31 IST)
भारतात सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची मागणी वाढली आहे. मारुती सेलेरियो सीएनजी ही देशातील सर्वात मायलेज देणारी सीएनजी कार आहे. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनयेते, जे पेट्रोलवर 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते तर सीएनजीवरील पॉवर आउटपुट 56.7पीएस/82 एनएम आहे, जे नियमित पेट्रोल व्हर्जनपेक्षा 8.5पीएस/7एनएम कमी आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते तर पेट्रोल व्हर्जनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल (स्टँडर्ड) आणि 5-स्पीड एएमटीचा ऑप्शन मिळतो. हे सेगमेंट फर्स्ट ऑटोमॅटिक आइडल स्टार्ट-स्टॉप फीचर्ससह देखील येते.
 
मारुती सेलेरियोची किंमत 5.35 लाख रुपयांपासून ते 7.13 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार  LXI, VXI, ZXI आणि ZXI+ या चार ट्रिम लेव्हलमध्ये येते. कारच्या VXI ट्रिममध्ये सीएनजीचा ऑप्शन उपलब्ध आहे. सीएनजीवर ही कार 35.6 किलोमीटरपर्यंत मायलेज देते. सीएनजीची किंमत 80 रुपये प्रतिकिलो (काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त) असेल तर मारुतीची ही कार चालवण्याचा खर्च किंमत जवळपास 2.2 रुपये प्रतिकिलोमीटर येईल.
 
मग सीएनजी म्हणजे काय आहे, कसे आहे हे इंधन याचा उपयोग आहे. आपण जाणून घेवूयात ...
 
CNG च्या वापराने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. CNG चा शोध हा सर्वप्रथम अमेरिकेमध्ये William Hart यांनी लावला आणि हा शोध साधारणतः सन १८०० च्या जवळपास लागला होता.
 
शोध लागल्यानंतर Fredonia Gas Light Company या पहिल्या नैसर्गिक वायू वितरण करणाऱ्या कंपनीची अमेरिकेतील निर्मिती झाली. अमेरिकेमध्ये CNG चा वापर विविध कामांसाठी सुरु झाला आणि नंतर CNG चा वापर हा इटली, फ्रान्स आणि इतर युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आला. तसेच काही काळानंतर या युरोपीय देशांनी CNG ला प्राथमिक इंधन मानून घोषित केले.
 
आता आजच्या काळात आपण भारतामध्ये सुद्धा CNG च्या वापरावर जोर देण्यात येत आहे आणि याचे कारण म्हणजे याचे स्वस्त दर आणि CNG चा प्रदूषण न करणारा गुणधर्म असे आहे.
 
CNG गॅस हा एका प्रकारचा नैसर्गिक वायू
CNG गॅस हा एका प्रकारचा नैसर्गिक वायू आहे, याचा उपयोग Petrol, Gas, Diesel किंवा LPG च्या ऐवजी वापरला जाऊ शकतो. CNG पेट्रोल, डिझेल च्या तुलनेत खूप कमी प्रदूषण निर्माण करतो.
 
CNG ला Ideal Fuel असे म्हणतात कारण हा गॅस जवळपास पूर्णपणे Burn होतो, यातून प्रदूषण करणारे वायू बाहेर पडतात परंतु त्यांचे प्रमाण खूप कमी असते. पेट्रोल व डिझेल च्या ज्वलन प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, आणि नायट्रोजन ऑक्साईड्स वायू उत्सर्जित होतात, जे पर्यावरणासाठी खूप विनाशकारी आहेत.
 
सीएनजी वायू ला ठेवण्यासाठी Gas Cylinder एवढ्या टाकीचा वापर करतात. CNG गॅस 93.05% Methane, Nitrogen, Carbon Dioxide, Propane, आणि थोड्या प्रमाणात Ethane पासून बनवलेला असतो. हा वायू पर्यावरणदृष्ट्या एक स्वच्छ पर्यायी इंधन आहे, कारण याच्या ज्वलानाच्या प्रक्रियेत कमी प्रमाणात हरितगृह वायू उत्सर्जित होतात.
 
सीएनजी गॅस खूप जास्त ठिकाणी वापरला जातो, याचे कारण म्हणजे CNG चे फायदे, ते खालीलप्रमाणे-
1) पेट्रोल, डिझेल च्या तुलनेने CNG गॅस स्वस्त मिळतो.
2) पेट्रोल, डिझेल च्या तुलनेत मायलेज जास्त मिळते.
3) या गॅस चे ज्वलन झाल्यावर जे वायू उत्सर्जित होतात ते पर्यावरणाला नुकसान दायक नसतात.
4) सीएनजी वायू चे ज्वलनाचे तापमान जास्त असल्याने वाहनांना आग लागण्याचा धोका कमी होतो.
5) सीएनजी गॅस वापरणाऱ्या इंजिन मधून आवाज कमी येतो त्यामुळे ध्वनी प्रदूषण कमी होते.
 
CNG च्या वापरण्याचे सुद्धा काही नुकसान आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत:
* CNG हा गंधहीन असल्याने जर याची गळती होत असेल तर ते समजणे फार कठीण असते. 
* वाहनामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पेक्षा CNG इंजिन बनवण्याचा खर्च हा खूप जास्त असतो. 
* CNG चा आताच वापर सुरु झाल्याने याचे पेट्रोल पंप सारखे स्टेशन जास्त ठिकाणी उपलब्ध नाहीत. 
* CNG चे सिलेंडर हे वजनाने जड असतात. 
* CNG च्या वापरामुळे फक्त एक इंजिन मध्ये प्रॉब्लेम येतो तो म्हणजे इंजिन चे ऑइल, हवेचे फिल्टर आणि * एक्सस्ट व्हाल्व लवकर खराब होतात आणि ते वारंवार बदली करावे लागतात.

सीएनजी हा एक नैसर्गिक वायू आहे. या वायू चा वापर रिक्षा, बस, कार मध्ये इंधन म्हणून केला जातो. वाहनात मागच्या बाजूला एक गॅस च्या टाकी सारखी टाकी असते, त्यात हा CNG गॅस भरलेला असतो व त्याद्वारे वाहन चालवले जाते. सीएनजी गॅस हा पर्यावरणास हानी पोहोचवत नाही, यामुळे सरकार सुद्धा CNG चा वापर करावा असे आवाहन करते.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लग्नघरात सिलेंडर फुटला, पाच नातेवाईकांचा मृत्यू