Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारने बंदी घातल्यास तुमच्या Cryptocurrency चे काय होईल?

सरकारने बंदी घातल्यास तुमच्या Cryptocurrency चे काय होईल?
, बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (12:46 IST)
मोदी सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिप्टोकरन्सीवर बंदी असल्याच्या बातम्यांनंतर गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे. गुंतवणुकदारांना सतावणारा प्रश्न हा आहे की सरकारने क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली तर काय होईल?
 
गेल्या अनेक दिवसांपासून देशातील क्रिप्टोकरन्सीबाबत बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सर्व वेबसाइट्स क्रिप्टोकरन्सी आणि किप्ट्रो एक्सचेंजेसच्या जाहिरातींनी भरलेल्या होत्या. बिटकॉइन, टिथर, डॉगकॉइन इत्यादी अनेक क्रिप्टोकरन्सी लोकांच्या ओठावर आल्या. झटपट नफा कमावण्याच्या लालसेपोटी मोठ्या प्रमाणात लोकांनी यात गुंतवणूक केली.
 
क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशिअल डिजिटल करन्सी बिल, 2021 भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिकृत डिजिटल चलनाच्या निर्मितीसाठी आधारभूत फ्रेमवर्क तयार करण्याचा प्रयत्न करते. प्रस्तावित विधेयक भारतात सर्व प्रकारच्या खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा प्रयत्न करते. तथापि, तंत्रज्ञान आणि त्याच्या वापराशी संबंधित क्रिप्टोकरन्सीच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी याला अपवाद आहेत.
 
सध्या भारतात क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत कोणतेही निर्बंध किंवा नियम नाहीत. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला क्रिप्टोकरन्सींवर वरिष्ठ अधिकार्‍यांसह बैठक घेतली आणि या समस्येचा सामना करण्यासाठी कठोर नियामक उपाययोजना केल्या जातील असे संकेत दिले.
 
सध्या सर्वांच्या नजरा मोदी सरकार क्रिप्टोकरन्सींवर बंदी घालणार की काही निर्बंधांसह व्यापाराला परवानगी देणार याकडे आहेत? हे सर्व विधेयक आल्यानंतरच कळेल.
 
निर्बंधांचा काय परिणाम होईल : क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातल्याचा काय परिणाम होईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे. जेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यास क्रिप्टोकरन्सीचे काय होईल?
 
अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की हे बिल बिटकॉइनसह इतर क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना कठीण बनवू शकते. सरकारने क्रिप्टोवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यास, बँक आणि तुमचे क्रिप्टो एक्सचेंजेसमधील व्यवहार बंद होतील. तुम्ही कोणतेही क्रिप्टो खरेदी करण्यासाठी तुमचे स्थानिक चलन रूपांतरित करू शकणार नाही. तसेच तुम्ही त्यांची पूर्तता करू शकणार नाही.

दुसरीकडे, जर ते नियमांच्या कक्षेत आणले गेले तर देशातील गुंतवणूकदारांमध्ये त्याची लोकप्रियता आणखी वाढेल. क्रिप्टो एक्स्चेंजच्या मदतीने तुम्ही सहज व्यवहार करू शकाल आणि त्याचबरोबर अनेक बँकांनाही व्यवहारांची सुविधा मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिप्टो करन्सीवर बंदी: RBI अधिकृत डिजिटल करन्सी CBDC जारी करेल, अशा प्रकारे मिळेल लाखो भारतीय यूजर्सला दिलासा