सैराट चित्रपटाची झिंगाट जितकी प्रेक्षकांवर चढलीये तितकीच बॉलिवूड आणि मराठीतील कलाकारांवर पाहायला मिळतेय. बॉलिवूड तसेच मराठीतील अनेक कलाकार, दिग्दर्शकांनी नागराज मुंजुळे यांच्या सैराट चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केलेय. नटरंग फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही सैराट पाहिला आणि या चित्रपटाने तिला याडच लावलं असं सोनालीने ट्विटर म्हटलंय.
सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसांपासूनच विक्रमांचे इमले रचतोय. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा सैराट हा पहिला चित्रपट ठरलाय. या चित्रपटाने आतापर्यंत 55 कोटींची कमाई केलीय. इतकी बक्कळ कमाई आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला करता आलेली नाही.