Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Aai Kuthe Kay Karte :अरुंधतीने थाटला आशुतोष सोबत नवा संसार

Aai Kuthe Kay Karte :अरुंधतीने थाटला आशुतोष सोबत नवा संसार
, शुक्रवार, 17 मार्च 2023 (14:59 IST)
आई कुठे काय करते ही मालिका खूप गाजली असून या मालिकेतील अरुंधती ही सध्या महाराष्ट्राच्या घरा घरात पोहोचली आहे. या मालिकेत अरुंधती हेच आशुतोष सोबत लग्न झाले आहे. तिचा नवा संसार सुरु झाला आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाला देशमुख कुटुंबियातील काही लोकांचा विरोध होता तर काही जण या लग्नापासून आनंदी होते. अखेर अरुंधती आणि आशुतोषचा लग्न सोहळा पार पडला आणि अरुंधती आशुतोषच्या घरी नांदायला आली. त्यांच्या नव्या संसाराला सुरुवात झाली असून त्यांच्या नव्या संसाराचा प्रोमो समोर आला आहे.
 
या प्रोमोमध्ये त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होत असून ते दोघे नाश्त्याची तयारी करताना दिसत आहे. किचन मध्ये अरुंधती नसून आशुतोष चहा करत असतो आणि त्याला किचन मध्ये पाहून अरुंधती म्हणते देशमुखांकडे नाश्त्यात चार ते पाच पदार्थ बनत होते. सगळ्यांच्या आवडी निवडी वेगळ्या कोणाला पोहे आवडायचे तर कोणाला उपीट. त्यावर आशुतोष तिला तुला काय आवडायचे असे विचारतो. त्यावर अरुंधती स्तब्ध होऊन आशुतोष कडे बघत असते. काय झालं असं विचारल्यावर ती म्हणते मला आधी कोणीच विचारलं नाही की तुला काय आवडतं .आता अरुंधती आणि आशुतोषचा नवा संसार कसा होतो हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.प्रोमोचा हा व्हिडीओ मधुराणी प्रभुळकर हिने शेअर केला आहे.  
 
Edited By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ishita Dutta: दृश्यम 2 फेम इशिता दत्ता होणार आई