बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेता उमेश कामत देखील सामील असल्याचं समोर आलं होत. त्यावरचं आक्षेप नोंदवत उमेश कामतने बेजबाबदार प्रत्रकारितेला चांगलेच सुनावले आहे.
झाले असे की, या प्रकरणात उमेश कामत नावाच्या आरोपीची व्हाट्सअप चॅट समोर आली होती. त्यावेळी काही वृत्तवाहिन्यांनी अभिनेता उमेश कामत याचा फोटो वापरला होता. या प्रकरणाशी काहीही संबंध नसलेल्या अभिनेता उमेश कामतने याविरोधात कारवाई करण्याचे ठरवले आहे.
हा सगळा प्रकार लक्षात येताच अभिनेता उमेश कामतने आपल्या सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहून याबाबत खुलासा केला केला आहे. आणि या बेजबाबदार वृत्तवाहिन्यांविरोधी योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या अभिनेत्याने लिहिले की, आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी उमेश कामत याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे.या प्रकारामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी संबंधित मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितच करेन.